। सुकेळी । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील सुकेळी येथिल बी.सी.जिंदाल चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल यांच्या वतीने जिंदाल रुग्णालयामध्ये शुक्रवार (दि.24) रोजी घेण्यात नेत्र तपासणी शिबिरात नागोठणे, कोलाड विभागासह ऐनघर पंचक्रोशीतील सुमारे 140 नागरिकांनी लाभ घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन कलावती कोकळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुकेश दुबे, मनोहर सुटे, राजेंद्र कोकळे, के.के.पांडे, जिंदाल रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.गोपाल परमार, श्याम बिंदल, अर्पन रॉय, सर्वेश पांचोळी, डॉ.अनुप डॉ.इरम शेख, डॉ.प्रिया भोईर, मनोहर अग्रवाल आदिंसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरामध्ये पनवेल येथिल नेत्रतज्ञ डॉ. मैथिली मेहतर, डॉ.सृष्टी कुरुगंले, डॉ.प्राजंल बिंदल व त्यांच्या सहकार्यांकडुन रुग्णांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली. व अल्प दरामध्ये चष्मे देण्यात आले.