म्हसळ्यातील शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत

। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यात आजपर्यंत 3820 मि.मि.पावसाची नोंद झाली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत तालुक्यात झालेले पर्जन्यमान यावेळी सोसाट्याचा वारा-वादळ या सोबत झाल्याने घर, गोठे यांच्या पडझड झाल्याची माहिती महसूल विभागाकडून समोर येत आहे. यावर्षी शेती, फळबागायतींची नुकसान सोडून तालुक्यातील अनेक गावातून 35 लाभार्थांचे सुमारे 10 लाख 88 हजार 265 रूपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. अद्याप इतके दिवस उलटूनही मदत न मिळाल्यामुळे हे नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहे. तालुक्यातील म्हसळा, घोणसे, गणेश नगर, सुरई, काळसुरी, मेंदडी, कुडगांव, पेढांबे, वारळ, कांदळवाडा, संदेरी, आगर वाडा, साळविंडे, सोनघर, तुरूंबाडी, दुर्गवाडी, तोंडसुरे (जंगमवाडी), पांगळोली या महसुली गावातील 35 लाभार्थींचे सुमारे 10 लाख 88 हजार 265 रूपयाचे आर्थिक नुकसान झाल्याचे महसुली पंचनाम्यामध्ये स्पष्ट झाले आहे. बहुतांश लाभार्थींचे छतावरील कौले-कोने, सीमेंट व स्टीलचे पत्रे, वासे, पडवी, भिंत अति पावसाने कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.

Exit mobile version