| बंगळुरु | वृत्तसंस्था |
आयपीएलच्या 16व्या हंगामात साखळी फेरीचे सामने संपले. 70 सामन्यांनंतर पात्रता फेरीचे चार संघ निश्चित झाले. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. या पराभवानंतर आरसीबीचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला. पात्रता फेरीतील पहिला सामना मंगळवार, 23 मे रोजी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. यानंतर चेन्नईतच मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात बाद फेरीचा सामना होणार आहे. क्वालिफायर-2 हा क्वालिफायर-1 मध्ये पराभूत झालेला संघ आणि एलिमिनेटर सामना जिंकणारा संघ यांच्यात खेळला जाईल. या सामन्यातील विजयी संघ क्वालिफायर-1 च्या विजेत्याशी अंतिम सामना 28 तारखेला खेळेल.
गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यांनी 14 पैकी 10 सामने जिंकले. गुजरातने 20 गुणांसह पहिले स्थान मिळविले. चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांनी प्रत्येकी आठ सामने जिंकले. दोघांमधील एक सामना रद्द झाला. अशा प्रकारे चेन्नई आणि लखनऊचे 17-17 गुण होते. चांगल्या नेट रनरेटच्या आधारे चेन्नईने दुसरे स्थान पटकावले. तर लखनऊला तिसरे मिळाले. मुंबईला आठ विजयांतून 16 गुण मिळाले, ते चौथ्या क्रमांकावर आहेत.
आयपीएलच्या 16व्या हंगामात साखळी फेरीचे सामने संपले. 70 सामन्यांनंतर पात्रता फेरीचे चार संघ निश्चित झाले. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. या पराभवानंतर आरसीबीचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला. त्याचे पात्रता फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले. मुंबई इंडियन्सने आरसीबीच्या पराभवाचा फायदा घेत अंतिम-4 मध्ये आपले स्थान निश्चित केले.
आरसीबीचं स्वप्न भंगलं
गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने 20 षटकात 5 विकेट्स गमावत 197 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने 19.1 षटकांत चार गडी गमावून 198 धावा केल्या. या सामन्यात दोन शतके पाहायला मिळाली. आरसीबीकडून अनुभवी विराट कोहलीने नाबाद 101 धावांची खेळी केली. त्यानंतर भारताचा युवा स्टार शुबमन गिलने नाबाद 104 धावा केल्या. यावेळी युवा गिलच्या शतकाने अनुभवी कोहलीच्या शतक झाकोळले गेले.
सामन्यांचे वेळापत्रक
23 मे क्वालिफायर-1 गुजरात विरुद्ध चेन्नई, चेन्नई संध्याकाळी 7.30 वा
24 मे एलिमिनेटर लखनऊ विरुद्ध मुंबई, चेन्नई संध्याकाळी 7.30 वा
26 मे क्वालिफायर-2-अहमदाबाद संध्याकाळी 7.30 वा
28 मे फायनल – अहमदाबाद संध्याकाळी 7.30 वा