। मुंबई । वृत्तसंस्था ।
शिवसेना नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची काल (दि.23) पासून प्रकृती बिघडल्याचे समजते. सध्या त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी उद्धव ठाकरेंसह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे हिंदुजा रुग्णालयात दाखल झाल्याचे समजते.