नागोठणे | वार्ताहर |
गोरेगावच्या परिसरात उभारण्यात येणार्या आंबेडकर स्मारकासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या सहकार्याने सव्वा दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.त्याबाबतचे पत्र पंचशील बौध्दजन सेवा संघ या संस्थेच्या पदाधिकार्यांकडे खा.सुनील तटकरे यांनी सुपूर्द केला.
कार्यक्रमाला बौध्दजन सेवा संघ संस्थेचे अध्यक्ष विकास गायकवाड़, रामदास महाडिक, संतोष साळवी, चंद्रमणी साळवी, संदीप साळवी, सुभाष गायकवाड़ गुरुजी, दिलिप साळवी, सुप्रिया साळवी, उदय गायकवाड़, सिध्दार्थ शिंदे, निलेश साळवी, भाई टके, जयवंत मुंडे, विलास चौलकर आदींसह गोरेगाव येथील पंचशील बौध्दजन सेवा संघ या संस्थेचे पदाधिकारी व समाजबांधव यावेळी उपस्थित होते.