| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील शिंदे, फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल. यामध्ये माझी पण निवड निश्चित असून, रायगडचे पालकमंत्रीपद आपल्याकडेच असेल, असा दावा आ. भरत गोगावले यांनी केला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर खाजगी वृत्तवाहिन्यांशी बोलताना गोगावले यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार निश्चित होईल, असा दावा केला आहे.