| अलिबाग | वार्ताहर |
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत शनिवारी (दि.27) सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत श्री समर्थ मंगल कार्यालय, समर्थ ढाबा शेजारी, जाधव फार्म, मुंबई-पुणे हायवे, खोपोली ता.खालापूर या ठिकाणी शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02141-222029 किंवा महेश वखरे, (9421613757) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्र.सहायक आयुक्त शा.गि.पवार यांनी केले आहे.