पीएनपी वेश्वी शाळेत आजी-आजोबांचा मेळावा

| अलिबाग | प्रतिनिधी |

पीएनपी प्राथमिक शाळा वेश्वी-अलिबाग येथे गुरूवारी (दि.27) फेबु्रवारी आजी-आजोबा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला बहुसंख्येने आजी-आजोबा उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. आलेल्या पाहूण्यांचे स्वागत मुख्याध्यापिका यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देउन करण्यात आले.

याप्रसंगी आजी-आजोबांचे पुजन त्यांच्या नातवंडांकडून करण्यात आले. यामुळे आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यानंतर आजी-आजोबांची भाषणे झाली. आजी-आजोबांनी कार्यक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. तसेच, हा उपक्रम राबवुन आजी-आजोबांचे नातवांशी असलेले नाते अधिकच घट्ट झाल्यामुळे त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे तसेच शिक्षकांचे कौतुक केले. विदयार्थ्यांनी आजी-आजोबांबद्दल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात आजी-आजोबांसाठी मनोरंजनात्मक खेळाचे नियोजन करण्यात आल होते. यावेळी संगित खुर्ची तसेच अनेक खेळ खेळताना उतार वयातही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. खेळात विजयी आजी-आजोबांना मुख्यध्यापिकांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे यांनी केले. तर, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रिना वाटवे यांनी केले. शेवटी सर्व आजी-आजोबांचा एकत्रित फोटो काढून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Exit mobile version