शेतकर्‍यांचा बांधावर जाऊन सन्मान

रायगड प्रेस क्लबतर्फे रतीश मगर, केशव खरीवले सन्मानित

। चणेरा । प्रतिनिधी ।

रायगड प्रेस क्लब व रोहा प्रेस क्लबच्या वतीने तालुक्यातील प्रयोगशील शेतकर्‍यांचा शेतीच्या बांधावर जाऊन सन्मान करण्यात आला. घोसाळेतील प्रयोगशील युवा शेतकरी रतीश मगर आणि सांगडे येथिल केशव खरिवले यांना आदर्श शेतकरी म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आज शेती व्यवसायापासून दूर जातोय हे वातस्व असतानाच, रायगड प्रेस क्लब अभिनव उपक्रम सुरू केला. बळीराजाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेस क्लबच्या माध्यमातून जिल्ह्यातील कृतीशील प्रगत आणि शेतीनिष्ठ शेतकर्‍यांचा सन्मान त्यांच्याच शेताच्या बांधावर जाऊन दरवर्षी केला जातो. या अनुषंगाने रोहा प्रेस क्लबच्यावतीने नुकतेच आदर्श शेतकरी सन्मानाने प्रयोगशील युवा शेतकरी रतीश मगर आणि केशव खरिवले यांना त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन गौरविण्यात आले. या सोहळ्याला रोहा तालुका कृषी अधिकारी महादेव करे, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, अधिकारी कांबळे आण्णा, प्रिया कांबळे, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरीवले, कृषी अधिकारी प्रकाश राक्षीकर, राजेंद्र जाधव, पोलीस अधिकारी सुनील शिरसाट, शरद कोटकर, गणेश ढेरे, युवा कार्यकर्ते महेश तुपकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version