पनवेल परिसरात दोन अपघातात

दोन ठार; एक जखमी
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार व एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर व खान्देश्‍वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दादर वरून पुणे येथे पार्सल घेऊन टेम्पोचालक तिवारी जात असताना त्याने पनवेल जवळील पळस्पे येथे संतोष उदावंत या व्यक्तीला खोपोली येथे सोडण्यासाठी टेम्पोत घेतले. सदर गाडी पुढे गेली असता त्याच मार्गावरील अमोल पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरवर टेम्पो जाऊन धडकला यात संतोष उदावंत यांचा मृत्यू झाला आहे.

दुसर्‍या घटनेत मोटारसायकलस्वार आतिष भोईर हा त्याचा नागेश याला सोडण्यासाठी सुकापूर येथून भोकरपाडा येथे जात असताना आकुर्ली गावाजवळ समोरून येणार्‍या पिकअप टेम्पोला त्यांच्या मोटारसायकलीची धडक बसून आतिष भोईर याचा मृत्यू झाला आहे तर त्याचा मित्र नागेश हा जखमी झाला आहे.

Exit mobile version