| अलिबाग | शहर प्रतिनिधी |
महाराष्ट्र दिनी रायगड जिल्हा कामगार न्यायालय अलिबाग येथे सुरु होणार आहे. सदर न्यायालयाचा शुभारंभ पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे, असे जिल्हाधिकारी डॅा. योगेश म्हसे यांनी सांगितले. त्याबाबत जिल्हाधिकारी. यांची ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांनी त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांचे आभार मानले. सोबत अॕड.के. डी. पाटील होते.
रायगड जिल्ह्यासाठी असलेले कामगार न्यायालय पूर्वी वागळे इस्टेट ठाणे येथे होते. औद्योगिक जिल्हा असलेल्या रायगडसाठी वेगळे कामगार न्यायालय मंजूर करावे अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा रायगडचे सुपुत्र ना. मनोहर जोशी यांच्याकडे केली होती. तसेच पत्रकार परिषदेत १९९५ साली केली व पाठपुरावाही केला. म्हणून सदर न्यायालय मंजूर झाले. ते जिल्हा मुख्यालयात सुरू होणार होते. पण तत्कालीन पालकमंत्री प्रभाकर मोरे यांनी महाड येथे चालू केले. पण सदर ठिकाण जिल्ह्याच्या एका टोकाला असल्यामुळे ते गैरसोईचे होते. म्हणून अन्यायग्रस्त कामगार वर्गात असंतोष पसरल्याचे जाणवत होते.
ही बाब ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांनी दि. २१ / १ / २१ च्या पत्रानुसार जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणली. त्यानंतर जिल्हाधिकारी सदर न्यायालय अलिबाग येथे हलविण्यास हिरवा कंदिल दाखविला.
पण पुढील कार्यवाही न झाल्यामुळे वालेकर यांनी १० / ४ / २३ च्या पत्रानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने कार्यवाही करावी अशी विनंती केली. म्हणून जिल्हाधिकारी यांनी कामगार न्यायालय जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीत ग्राहक तक्रार निवारण कक्षाशेजारी सुरू होईल असे कळविले.
तसेच कामगार न्यायालयाचा शुभारंभ येत्या महाराष्ट्र दिनी होण्याच्या द्रुष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.