| पेण | प्रतिनिधी |
स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत केंद्राच्या आदेशानुसार पेण नगर परिषद हद्दित थ्री आर केंद्र सुरू करण्यात आले आहे. यात आपल्याला नको असलेल्या, मात्र वापरण्योंग्य वस्तू ठेवून त्या गरजूंनी गरजेनुसार घेऊन जायच्या आहेत. पेण नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी पेणकरांना मानवतेचा धर्म पाळा, असे आवाहन या केंद्राच्या उद्घाटनावेळी केले.
मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर हे अभियान सुरू करण्यात आले असून, या अंतर्गत पेण नगर परिषदेमार्फत थ्री आर केंद्र स्थापन केले आहे. या कार्यक्रमाला आरोग्य निरीक्षक शिवाजी चव्हाण, आस्थापना विभागाचे उमंग कदम, नरेंद्र पाटील, मंथन शिंदे तसेच आरोग्य व स्वच्छता विभागाचे सर्व मुकादम, सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते. दि. 20 मे ते 5 जून या कालावतीध सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यत हे केंद्र सुरू राहणार आहे. नागरिकांनी आपल्याजवळील किंवा घरामध्ये असलेल्या जुन्या वस्तू, जुनी भांडी, जुनी पुस्तके, कपडे, जुने चप्पल बूट, इलेक्ट्रॉनिक वस्तू यासारख्या वापरण्यायोग्य वस्तू या ठिकाणी जमा करायच्या आहेत.
जीवन पाटील,
स्वच्छ व सुंदर पेण शहरासाठी सर्वाचे सहकार्य अपेक्षित आहे. त्या दृष्टीने चांगली सुरूवात व प्रतिसाद मिळत आहे. याचे समाधान निश्चित आहे.
मुख्याधिकारी, पेण