। कोलंबो । वृत्तसंस्था ।
आशिया कप 2023 मध्ये रोहित शर्मा आणि कंपनी आजपासून सुपर-4 ला सुरू करणार आहे. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपर फोरचा सामना रंगणार आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला आहे. आशिया कपच्या पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात केएल राहुल संघात संधी दिली आहे.
या सामन्यावर पावसाचे सावट आहे. मात्र, त्यासाठी उद्याचा राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. या दोघांमधील गटातील सामना अनिर्णित राहिला. पाऊस न पडल्यास दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होऊ शकते.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11 भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, आगा सलमान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.