| मुंबई | प्रतिनिधी |
भारत आणि नेदरलँड यांच्यात साखळी फेरीतील शेवटचा सामना असणार आहे. भारताचं या सामन्यात पारडं जड आहे. तसेच साखळी फेरीतील सर्व सामने जिंकण्याचा मान मिळणार आहे. बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी मैदानात हा सामना असणार आहे.
उद्याच्या सामन्यात नेदरलँडला नमविले तर विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत सर्व संघांना पराभूत करणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. तर, नेदरलँड या स्पर्धेत आणखी एक विजय मिळवून शेवट गोड करण्याच्या तयारीत आहे. कारण, गुणतालिकेत आठवे स्थान गाठलं तर चॅम्पियन ट्रॉफी 2025 चं तिकीट मिळणार आहे.
भारत आणि नेदरलँड यांच्या आतापर्यंत दोन एकदिवसीय सामने झाले आहेत. दोन्ही सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यातही भारताचं पारडं जड आहे. पण नेदरलँडला कमी लेखून चालणार नाही. दक्षिण अफ्रिकेला पराभवाची धूळ चारली आहे.
