| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
मारहाण करून चाळीस लाख 60 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना खारघरमध्ये घडली. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात 23 एप्रिल रोजी तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सुशांत नामदेव मोरे (41) राहणार सेक्टर 12 खारघर हे त्यांच्या घराच्याजवळ एफ लाईन कॉर्नर समोरील रस्त्यावर सेक्टर 12, खारघर या ठिकाणी त्यांचे चालक महेश हाटे, मित्र अभिनंदन हे कार पार्किंग करून पायी चालत चाळीस लाख साठ हजार रुपये किमतीचे दागिन्यांची पिशवी घेऊन मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घरी जात होते. यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या तिघांनी सुशांत मोरे यांना चाकूने मारहाण करून जखमी केले तसेच महेश हाटे आणि अभिनंदन यांना हाताने मारहाण केली आणि मोरे यांच्या हातातील 40 लाख 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली पिशवी जबरदस्तीने घेऊन ते पळून गेले.







