पत्रकार केवळ महाडिक अध्यक्षपदी

| पनवेल | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनच्या अध्यक्षपदी पत्रकार केवल महाडिक यांची तर कार्याध्यक्षपदी संतोष भगत, उपाध्यक्षपदी सुनील पाटील, सचिवपदी संतोष सुतार, सहसचिवपदी शैलेश चव्हाण, खजिनदारपदी सोनल नलावडे यांची नियुक्ती सल्लागार दीपक महाडिक यांच्या मार्गदर्शनानुसार संघटना काम करत आहे. सदस्य म्हणून नितीन जोशी, विशाल सावंत, निलेश घाग, विद्यासागर ठाकूर, मनोहर पाटील, दिपाली पारसकर, संदिप कलोते, रवींद्र चौधरी, संतोष आमले, चंद्रशेखर भोपी, प्रगती दांडेकर आदी सहभागी असून कायदेशीर सल्लागारपदी अ‍ॅड. मनोहर सचदेव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशन व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टच्या वतीने ब्लँकेट वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष केवल महाडिक, कार्याध्यक्ष संतोष भगत, सचिव संतोष सुतार, श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे ऍड. मनोहर सचदेव, सदस्य नितीन जोशी,निलेश घाग, शशिकांत दळवी, संतोष आमले आदी उपस्थित होते.

Exit mobile version