| अलिबाग | प्रतिनिधी |
बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल 25 मे रोजी जिल्ह्यात सर्वत्र जाहीर झाला. त्यात विज्ञान शाखेचा सरासरी निकाल 87.80 टक्के तर कला शाखेचा निकाल 89.74 टक्के इतका लागला आहे.यामध्ये अलिबागमधील जेएसएम महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.
कला शाखेतील श्रेया स्वप्नील अधिकारी या विद्यार्थिनीने 91.74 टक्के गुण मिळवले असून विज्ञान शाखेतील पुर्वा अजित ठाकूर हिने 84.17 टक्के इतके गुण प्राप्त केले आहेत. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या उत्तुंग यशाबाद्दल कला शाखेतील श्रेया अधिकारी, सिया पडवळ, सानिया म्हात्रे, सई पाटील, ज्वलिका मानकर, क्रांती पाटील तर विज्ञान शाखेतील पुर्वा ठाकूर, संस्कार राऊत, आदित्य कवळे, रुचिता म्हात्रे,आर्या डकारे या विद्यार्थ्यांचा जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड.गौतम पाटील व उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील,कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक संजय केदार, वरिष्ठ शिक्षक अजय सावंत व मिलिंद धोदरे उपस्थित होते.