। अलिबाग । वार्ताहर ।
‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी’ 2024 साठी लघु लघुकथा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेकरिता लेखकांनी आपली 300 शब्दांपर्यंतची अप्रकाशित लघुकथा पाठवायची आहे. लघु लघुकथा स्पर्धेकरिता विषयाचे बंधन नाही. प्रत्येक स्पर्धकाची एकच लघुकथा स्वीकारण्यात येणार आहे. लघुकथा कालनिर्णयच्या कार्यालयात 15 जून पर्यंत पोस्ट, कुरिअर किंवा ई-मेलनेवर पाठवावी. तसेच, सोबत लेखकाने स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो देखील पाठवायचा आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला रु. 5 हजार, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला रु. 3 हजार, तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला रु. 2 हजारचे बक्षीस दिले जाणार आहे. तसेच, दहा उत्तेजनार्थ विजेतेही निवडण्यात येणार आहेत. स्पर्धेविषयी परीक्षक व कालनिर्णय संपादन विभाग यांचा निर्णय अंतिम असणार आहे. छापून न आलेले साहित्य परत पाठविले जाणार नसल्याची नोंद स्पर्धकांनी घ्यावी.
साहित्य पाठवण्याचा पत्ताः
सुमंगल प्रेस प्रा.लि., 172, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय इमारत, एम.एम.जी.एस. मार्ग शारदा सिनेमाच्या शेजारी, दादर (पू.), मुंबई- 400014
ईमेल… kathaspardha@kalnirnay.com