| अलिबाग । प्रतिनिधी ।
झुंझार युवक मंडळ पोयनाड ह्या नोंदणीकृत संस्थेला स्थापन करून 60 वर्ष पूर्ण झाली आहेत, मंडळाच्या षष्टब्दीपूर्ती वर्षाच्या निमित्ताने दिनांक 06 मे रोजी झुंझारच्या मैदानावर भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने होणार्या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील प्रथम येणार्या 32 संघांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.विजयंत्या संघांना,खेळाडूंना आकर्षक बक्षिसांची खैरात असणार आहे, सायंकाळी 4 वाजता स्पर्धेचे उद्घाटन जिल्ह्यातील विविध क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी सर्व कबड्डीच्या रसिक प्रेक्षकांनी स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आव्हान झुंझार युवक मंडळाचे अध्यक्ष अन्वर बुराण व सचिव किशोर तावडे यांनी केले.