| गडब | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गडब येथील राष्ट्रीय कबड्डी पंच प्रदीप मोकल यांची खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.भारतीय खेळ प्राधिकरण भारत सरकार यांच्यावतीने आयोजित खेलो इंडिया विद्यापीठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा उत्तर प्रदेशमधील गौतमबुद्ध नगर येथे 23 ते 27 मेदरम्यान संपन्न होत आहेत. या स्पर्धेसाठी ॲमुचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाकडून प्रदीप मोकल यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.
प्रदीप मोकल यांनी जिल्हा व राज्यस्तरावर कबड्डी स्पर्धेत पंच म्हणून, तर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये निरीक्षक पंच प्रमुख म्हणून काम केले आहे. जपान व थायलंडचा कबड्डी संघ रायगडच्या दौऱ्यावर आलेला असताना झालेल्या इंडो जपान व इंडो थायलंड कबड्डी स्पर्धेत पंच म्हणून काम केले आहे.
प्रदीप मोकल यांची खेलो इंडीया कबड्डी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाल्याबद्दल रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी, जिल्हा कबड्डी पंच मंडळाच्या सदस्यांनी अभिनंदन केले आहे.