| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
हिंदुस्तान टाइम्सच्या देशातील विविध क्षेत्रातील 30 शीर्ष उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत जेएसएस रायगडचे संचालक विजय कोकणे यांचा समावेश करण्यात आला आहे. 130 राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन मॅक्झिन व वृत्तपत्रांमध्ये यादी प्रकाशित झाली आहे. सामाजिक, शैक्षणिक कार्य, कौशल्य विकास मार्गदर्शन तसेच वारली चित्रकलेतील संशोधन कार्य व योगदान दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
वारली चित्रकला व हस्तकलावर आधारित संशोधन कार्य व लिखाणासाठी साऊथ वेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाकडून मिळालेला मानद डॉक्टरेट आंतरराष्ट्रीय सन्मान, वेदांत, घोडदौड ह्याच्या बरोबरच पाच दर्जेदार पुस्तकांच्या लेखनातून समाज प्रबोधन व जन जागृतीसाठी मिळालेला आंतरराष्ट्रीय रवींद्रनाथ टागोर साहित्यरत्न पुरस्कार, महिला सक्षमीकरणासाठी लोक सहभाग कौशल्यविकास वृद्धी कार्यासाठी मिळालेला भारतीय समाजरत्न पुरस्कार आयकॉन ऑफ एशिया पुरस्कार-2023 भारतीय नोबल सोशल ऍक्टिव्हिस्ट ऑफ द इयर पुरस्कार इत्यादि पुरस्कार व अष्टपैलू कार्याची दखल व मूल्यमापन होऊन हिंदुस्तान टाइम्स व देशातील 130 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्र मॅक्झिन इत्यादींमध्ये सदर यादी जाहीर करण्यात आली आहे.
त्यांच्या संचालक पदाच्या कार्यकाळात केलेल्या सहकार्यबद्दल डॉ. किरीट सोमैया, डॉ. मेधा सोमैया, डॉ. रामकृष्ण सुरा, डॉ. नितीन गांधी, विद्या गांधी, गीतांजली ओक प्रा. अविनाश ओक, नरेन जाधव, ॲड. नीला तुळपुळे, स्वाती मोहिते, रत्नप्रभा बेल्हेकर, मानसी वैशंपायन, भगवान नाईक, हिरामण कोकणे, आशा कोकणे, सुमन कोकणे यांचे विशेष मानले.