| पनवेल | प्रतिनिधी |
लिटिल आयडल किड्स स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन पनवेल शहरातील आद्यक्रांतीवर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मोठ्या उत्साहात साजरे झाले. यावेळी मिलिंद खारपाटील, विश्वास भगत, अतुल तांबे, दीपक कदम, रंजिता पाटील, भगत, हिरामण कोकणे, राहुल गुप्ता, जयप्रकाश गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. छोट्या-छोट्या बच्चे कंपनीने अतिशय सुरेख नृत्य करुन पालक आणि प्रेक्षकांना खुर्चीस खिळून ठेवले होते. प्रत्येक गाण्यानंतर टाळ्या, शिट्या आणि वन्स मोअर असा जोरदार प्रतिसाद मिळत होता.
लिटिल आयडल किड्स स्कूलचे स्नेहसंमेलन
