कोलकात्याचा एका धावेनं पराभव
लखनौचा प्लेऑफमध्ये प्रवेश
| कोलकाता | वृत्तसंस्था |
अटीतटीच्या लढतीत लखनौने कोलकात्याचा एका धावेने पराभव केला. लखनौने दिलेल्या 176 धावंच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताने निर्धारित सात गड्यांच्या मोबदल्यात 175 धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याकडून पुन्हा एकदा रिंकू सिंहने लढा दिला. रिंकूने अर्धशतकी खेळी करत झुंज दिली. लखनौने अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवला. या विजयासह लखनौने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला.
तत्पूर्वी, लखनौ प्रथम फलंदादाजी करताना 176 धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात दणक्यात जाली. जेसन रॉय आणि वेंकटेश अय्यर यांनी 61 धावांची सलामी दिली. वेंकटेश अय्यर याने 15 चेंडूंत 24 धावांचे योगदान दिले. तर जेसन रॉय याने 45 धावांची खेळी केली. त्यानंतर नीतेश राणा आणि गुरबाज यांनी विकेट फेकली. गुरबाज याने 10 तर नीतीश राणा याने आठ धावांची खेळी केली. मोक्याच्या क्षणी आंद्रे रसेल सात, शार्दुल ठाकूर तीन, सुनील नारायण एक धावांवर बाद झाले. त्यानंतर रिंकूने एकाकी झुंज देत 33 चेंडूंत 67 धावांचे योगदान दिले.
रिंकूने लखनौच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. अखेरपर्यंत रिंकूने सामन्यात कोलकात्याचे वर्तवस्व ठेवले. त्याने चार षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने 67 धावांची खेळी केली. रिंकूला दुसऱ्या बाजूला साथ मिळाली नाही, त्याने एकाकी झुंज गिली. अखेरच्या चेंडूपर्यंत तो लढला. त्याच्या खेळीने कोलकात्याचे पराभवातील अंतर कमी झाले, त्यामुळे संघाचा अवघ्या एका धावेने पराभव झाला. लखनौकडून रवि बिश्नोई आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केले. तर, कृणाल पांड्या आणि कृष्णप्पा गौतम यांनी प्रत्येकी एक-एक बळी टिपला.