नेरळमधील आचार्य महाविद्यालयाची मग्रुरी

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडून वसूली

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील शेलू येथे असलेल्या आचार्य इन्स्टिटयूटमध्ये विधी शाखेत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी इंट्रन्स परीक्षा केंद्र असते. यावर्षी विधी शाखेसाठी असलेली परीक्षा रविवारी (दि.28) पार पडल्या. याठिकाणी परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडून सोबत आणलेल्या वाहनांसाठी पार्किंगची रक्कम घेतली जात होते. दरम्यान, परीक्षार्थ्यांनी परीक्षेचे केंद्र असलेल्या महाविद्यालयासाठी ठराविक रक्कम राज्य सरकारच्या तंत्र शिक्षण विभाग यांच्याकडून ऑनलाईन स्वरूपात भरली होती. त्यामुळे आचार्य कॉलेज प्रशासनाला कोणत्याही प्रकारची अतिरिक्त फी वसूल करण्याचे अधिकार नसताना पार्किंग फी वसूल करण्यात आली. त्यातच त्यांच्या पिण्याच्या पाण्याची देखील कोणतीच सुविधा नव्हती. तसेच, स्वच्छतागृह देखील उपलब्ध नसल्यामुळे या महाविद्यालयाची शासनाने चौकशी करावी, अशी मागणी विद्यार्थी वर्गातून केली जात आहे.

विद्यार्थ्यांकडून अवैध पार्किंगची वसूली
कॉलेज प्रशासनाला सीएटी परीक्षेसाठी सरकारकडून मोबदला देण्यात आलेला आहे. येथे येणार्‍या विद्यार्थ्याला योग्य ते सहकार्य देणे हे कॉलेज प्रशासनाचे कर्तव्य आहे. तसेच, कॉलेजच्या खुल्या जागेचा वापर हा पार्किंगसाठी असून देखील गेटच्या बाहेर टेबल लावून बसलेल्या कोणत्याही प्रकारचे आयडी न घातलेल्या लोकांकडून कॉलेजच्या नावाखाली पार्कींगची वसुली करण्यात येत आहे. पैसे दिले तरच तुम्हाला गाडी आतमध्ये नेता येईल, असे त्यांच्याकडून सांगण्यात येत होते.

जे परीक्षार्थी वाहने आतमध्ये पार्किंग करतात, त्या सर्वांकडून कॉलेजच्या सुविधा वापरल्या जातात. जे दुसर्‍या ठिकाणी पार्किंग करतात त्यांना त्या सुविधा उपलब्ध होत नाही. स्वच्छता गृहाची व्यवस्था देखील गेटच्या बाहेर असते. त्यामुळे आम्हाला अधिकचे संरक्षक देखील ठेवावे लागतात. शासनाकडून आम्हाला कोणतीही वेगळी रक्कम परीक्षा फंड म्हणून मिळत नसल्यामुळे महाविद्यालयातील सुविधा व पार्किंगसाठी पैसे आकारले गेले आहेत.

प्रा. पराग जमदरे,
एक्झाम सेल इन्चार्ज

Exit mobile version