बाजार समिती सभापतीपदी नारायण घरत; उपासभापतीपदी सुनील सोनावळे
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
महाराष्ट्रात महाविकास आघाडी उभी आहे. त्याचप्रमाणे पनवेल आणि उरण मतदार संघामध्ये महाविकास आघाडी भक्कमपणे काम करेल. आणि पनवेल आणि उरण विधानसभा एकत्रितपणे लढवून ते जिंकून आणू ,असा दावा, शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यानी व्यक्त केला.पनवेल बाजार समिती सभापती आणि उपसभापती निवडीच्यावेळी उपस्थितांसमोर ते बोलत होते. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढल्यास जिल्ह्यातील लोकसभेच्या दोनही जागा आणि विधनासभेच्या सातही जागा जिंकू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना त्यांनी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ता आल्याने आपली जबाबदारी वाढल्याचे सांगत पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठेसाठी तसेच मुख्य इमारतीसाठी लागणारा भूखंड मिळवण्यासाठी प्रयत्न करा अशी सूचना देखील यावेळी त्यांनी केली.त्याच प्रमाणे येत्या नऊ महिन्यात पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा दावा करत नवीन बाजारसमिती उभारण्यासाठी लागणाऱ्या निधीची कमतरता या मुळे आपल्याला भासणार नाही. यासाठी संबंधित मंत्र्यांकडे मी सुद्धा पाठपुरावा करणार असे त्यांनी सांगितले.
2024 च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आमचे सरकार येणार आहे. रायगड जिल्ह्यात आघाडी करत असताना आम्ही नेहमी आमचे सहकारी राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना सन्मानाची वागणूक दिली आहे. यापुढेही तशीच सन्मानाची वागणूक दिली जाईल.
आ.जयंत पाटील,शेकाप सरचिटणीस