सुनील तटकरे यांची ग्वाही
| महाड | प्रतिनिधी |
महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेते जाण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. भविष्यात रायगडातील महाविकास आघाडी स्नेहल जगताप यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही खा. सुनील तटकरे यांनी दिली.
कुमशेत ग्रामपंचायतीच्या बहुउद्देशीय कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी तटकरे बोलत होते. यावेळी स्नेहल जगताप उपस्थित होत्या. आज तटकरे यांनी ते स्वतः उदघाटक असताना स्नेहल माणिक जगताप यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाचे उदघाटन केले.
त्यावेळी त्यांच्या समवेत माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष केकाणे, उणेगावचे सरपंच राजुशेठ शिर्के, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख आण्णा अधिकारी, अध्यक्ष माणगाव तालुका समन्वय समिती इक्बालशेठ धनसे, कुमशेत सरपंच सचिन कदम, माजी सरपंच निलेश शिंदे, विभाग प्रमुख सिकंदर आंबोनकर, गोरेगाव युवा सेना प्रमुख अक्षय कदम, मुख्तारभाई डावरे बाळाभाई संगे, वालीभाई इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. त्याच बरोबर महाड येथील महेश शेडगे, साहिल हेलेकर, रोहित पोरे, अक्षय शेटे, शुभम महामुनकर इत्यादी उपस्थित होते.