काँग्रेस 102, शिवसेना 96 तर राष्ट्रवादीचे 87 जागांवर उमेदवार
| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दरम्यान, महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पाच ठिकाणी दोन उमेदवार दिले आहेत.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाकडून 96 उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून एकूण 96 एबी फॉर्म वाटप करण्यात आले आहेत. त्यानुसार उमेदवारी अर्ज मंगळवारी शेवटच्या दिवसापर्यंत दाखल करण्यात आले आहेत. आघाडीतील तीन पक्षांच्या मिळून 285 जागा होतात. यात 5 ठिकाणी दोन पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार दिलेत.म्हणजे 280 जागांवर हे तीन पक्ष एकत्रितपणे लढणार आहेत. उर्वरित आठ जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले.
तीन पक्षातील जागावाटप
काँग्रेस -102
शिवसेना उबाठा - 96
राष्ट्रवादी पवार गट- 87
आघाडीतील पक्षांनी अर्ज भरलेले मतदारसंघ
मिरज : शिवसेना ठाकरे गट -तानाजी सातपुते, काँग्रेस - मोहन वनखंडे. सांगोला - शिवसेना ठाकरे गट दीपक आबा साळुंखे, शेकाप - बाबासाहेब देशमुख. दक्षिण सोलापूर - काँग्रेस - दिलीप माने, शिवसेना ठाकरे गट - अमर पाटील. पंढरपूर - काँग्रेस भागीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अनिल सावंत. परांडा- शिवसेना ठाकरे गट रणजीत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष -राहुल मोटे. दिग्रस- शिवसेना ठाकरे गट - पवन जैस्वाल, काँग्रेस -माणिकराव ठाकरे.