| पनवेल | प्रतिनिधी |
राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक विवाहिता कोठे तरी निघून गेल्याने ती हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. प्रतीक्षा गायकवाड (35) असे या महिलेचे नाव असून, तिची उंची अंदाजे 5 फुट, रंग गोरा, चेहरा गोल, केस काळे, डोळे काळे, नाक सरळ, चेहरा गोल, बांधा मजबुत, अंगात नेसुन पोपटी रंगाचा ड्रेस व काळ्या रंगाची ओढणी तसेच मराठी भाषा बोलणारी सोबत सॅमसंग कंपनीचा मोबाईल आहे. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे किंवा पोहवा श्रीपत घरत यांच्याशी संपर्क साधावा.






