लखनौ | वृत्तसंस्था |
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वोसर्वा मायावती या यंदाची विधानसभा निवडणूक लढणार नाहीत, अशी माहिती बहुजन समाज पार्टीचे खासदार सतीशचंद्र मिश्रा यांनी माध्यमांना दिली आहे. याचबरोबर त्यांनी बसपा उत्तर प्रदेशमध्ये सरकार स्थापणार असल्याचा दावा देखील केला आहे. माजी मुख्यमंत्री मायावती आणि मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. समाजवादी पक्षाकडे 400 उमेदवार नसतील तर ते 400 जागा कशा जिंकणार? समाजवादी पार्टी किंवा भाजपा सत्तेवर येणार नाही, बसपा उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करणार आहे. असं बसपा खासदार सतीश चंद्र मिश्रा यांनी म्हटलं आहे.