कारच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

। पनवेल । प्रतिनिधी ।

भांडुप येथून पत्नीसह मोटारसायकलवरून दापोलीकडे जात असताना कारने धडक दिल्याने मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.4) पहाटे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेलजवळ घडली. महेंद्र कारकर (40) असे मृताचे नाव आहे. या अपघातात त्यांची पत्नी मृणाली कारकर (38) गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महेंद्र कारकर हे पत्नी मृणाली आणि मुलीसह भांडुप पश्चिम येथील कोकणनगर परिसरात राहत होते. ते मुंबईतील लीलावती रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून कार्यरत होते. रविवारी पहाटे ते पत्नीसह मोटारसायकलवरून दापोलीकडे निघाले होते. मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलजवळ त्यांच्या मोटारसायकलला कारने धडक दिली. या अपघातात महेंद्र यांचा मृत्यू झाला, तर मृणाली गंभीर जखमी झाल्या.

Exit mobile version