वाडगावमध्ये दीपोत्सवासह संगीत मैफिल

। रेवदंडा । प्रतिनिधी ।

वाडगाव येथे दीपावलीच्या लक्ष्मीपुजनाचे निमित्तान दीपोत्सव व संगित मैफिल कार्यक्रम घेण्यात आला. ॠषीकांत भगत मित्रमंडळ, अभिनव मित्रमंडळ व ग्रामस्थ वाडगाव यांच्या सहभागाने साडेसातचे सुमारास दिपोत्सव कार्यक्रमाचे नियोजन केले होते, यावेळी वाडगावमधील ग्रामस्थ, महिलावर्ग व युवावर्ग सहभागी झाले होते.

श्री मारूती मंदिराचे सभोवताली एक हजार दीप यानिमित्ताने प्रज्वलित करण्यात आले. शिवाय फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. रात्री साडेनऊ वाजता संगित मैफिलचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उस्ताद राशिद खान यांचे शार्गिद आडगावकर यांचे सुमधूर भजन संध्येचा तसेच गायनाची रसिक प्रेक्षकांना मेजवानी मिळाली.

यावेळी रोहन पंढरपुरकर यांनी तबला, स्वानंद कुलकर्णी यांनी हार्मोनियम, सिध्देश उडाळकर यांनी पखवाजाने साथ दिली. या संगित मैफिलसाठी सर्व स्तरातील मान्यवर मंडळीची व वाडगाव ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Exit mobile version