| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राजकीय वाटचालीचा गौरव करताना शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी त्यांच्या विधिमंडळातील कामगिरीचे विशेष कौतुक केले. विरोधी पक्षात असतानाही खडसे यांनी सातत्याने शेतकरी, सिंचन आणि ग्रामीण भागातील प्रश्नांना प्राधान्य दिले, असे पाटील यांनी सांगितले. एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी खडसे यांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीचे कौतुक केले. विरोधी पक्षात असताना सरकारला विविध मुद्द्यांवर धारेवर धरण्याची त्यांची भूमिका प्रभावी होती. विधिमंडळात मुद्दे मांडताना त्यांचा आवाज आणि आक्रमक शैली यामुळे त्यांनी वेगळे स्थान निर्माण केले, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
विधिमंडळात सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम कसे करायचे, हे एकनाथ खडसे यांच्याकडून शिकायला मिळाले, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी त्यांच्या विधिमंडळातील कामगिरीचा गौरव केला. शेतकरी आणि सिंचनाच्या प्रश्नांवर खडसे यांनी सातत्याने भूमिका घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. खडसे यांच्या राजकीय प्रवासाचा गौरव करताना जयंत पाटील यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांपासून ते शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नांपर्यंतच्या कामाचा विशेष उल्लेख केला. उत्तर महाराष्ट्रातील सिंचन योजनांना चालना देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचाही गौरव करण्यात आला.
राजकीय मतभेद असले तरी एखाद्या नेत्याच्या कार्याची दखल घेण्याची महाराष्ट्राची राजकीय परंपरा या सोहळ्यात पुन्हा दिसून आली, अशी चर्चा यानिमित्ताने रंगली. दरम्यान, या सोहळ्यात शरद पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक आजी-माजी मंत्री आणि राजकीय नेते उपस्थित होते. विविध पक्षांतील नेत्यांनी खडसे यांच्या विधिमंडळातील आक्रमक भूमिका, संघर्षशील नेतृत्व आणि महाराष्ट्रातील राजकीय योगदानाचा उल्लेख केला. यावेळी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे म्हणजेच नाथाभाऊ यांनी खऱ्या अर्थाने बहूजनांचे राजकारण पुढे नेण्याचे काम खऱ्या अर्थाने नेले आहे. विधी मंडळात त्यांची एक वेगळी पक्कड राहिली आहे. विधेयक म्हणजे बिलावर सर्वात जास्त बोलणारे आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे. त्याची नोंद विधीमंडळात घेतली गेली आहे. खडसे यांच्यासोबत विधान परिषदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. एकेकाळी आम्ही एकत्र काम केले आहे. त्यांचे कार्य खऱ्या अर्थाने कौतूकास्पद राहिले आहे, असे जयंत पाटील म्हणाले.






