| मुंबई | प्रतिनिधी |
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पलवटवण्यासाठी केंद्र सरकारनं दिल्ली सरकारविरोधात वटहुकुम आणला आहे. या वटहुकुमाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कडाडून विरोध केला असून याविरोधात त्यांनी देशभरातील सर्व पक्षीय नेत्यांची भेट घेत आहेत. यासाठीच त्यांनी मुंबईत येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवारांची भेट घेतली. यावेळी पवारांनी केजरीवालांना पाठिंबा जाहीर केला. तसेच केंद्रावर सडकून टीका केली.
शरद पवार म्हणाले, ही पत्रकार परिषद खूपच महत्वाची पत्रकार परिषद आहे. कारण देशासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. याची माहिती पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी खूपच चांगल्यापद्धतीनं दिली आहे. हा विषय केवळ दिल्लीचाही आहे, असं आम्हाला वाटत नाही. कारण संसदीय लोकशाही वाचवायची आहे की नाही यासाठी हे महत्वाचं आहे. कारण दिल्लीत जो आघात होत आहे तो देशाच्या संसदीय लोकशाहीवर आघात होत आहे. देशात लोकशाही आहे, निवडून येणारं सरकार राज्य करणार की या निवडून आलेल्या सरकारकडं दुर्लक्ष करणं ही समस्या संपूर्ण देशासमोर आहे. मला हे वाटतं की आत्ताच्या घडीला तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात हे महत्वाचं नाही. ही वेळ लोकशाही वाचवायचं आहे. संसदीय लोकशाही वाचवण्याचं आहे. सर्वसामान्य जनतेचं मत घेऊन आपलं सरकार बनवण्याचा जो अधिकार आहे म्हणजेच सर्वसामान्यांच्या मताचा अधिकार वाचवण्याचं गरजेजचं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आमचं समर्थन मागण्यासाठी आले आहेत, यावर माझ्या पक्षाच्यावतीनं, खासदारांच्यावतीनं तसेच महाराष्ट्राच्या जनतेच्यावतीनं केजरीवालांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.