। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ गावातील विद्या विकास मंडळाच्या विद्या विकास मंदिर या शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. विद्या विकास शाळेत दहावीच्या परीक्षेत जयेश नवल चौधरी हा 93.80 टक्के गुण मिळवून पहिला आला आहे. हर्षवर्धन संतोष मगर हा 93 टक्के गुण मिळवून दुसरा, तर किर्तिशा राजेंद्र म्हात्रे ही 92 टक्के गुण मिळवून तिसरी आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष बल्लाळ जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका विनया काकडे, मंडळाचे सदस्य जोगळेकर तसेच पालक आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते.