। खारेपाट । वार्ताहर ।
व्ही.जी. पाटील एज्युकेशनल फाऊंडेशन, खिडकी-आलिबाग आयोजित तालुकास्तरीय भजन स्पर्धा 2021 व मित्रद्वय गुरुशिष्य संगीत सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न झाला. सदर स्पर्धेत प्रथम क्रमाकांचा मानकरी ओम नाद ब्रम्ह-कुरूळ ठरला असून द्वितीय क्रमाक समर्थ महिला भजन मंडल भुवनेश्वर नारंगी, तृतीय क्रमाक गोपाल कृष्ण भजन मंडल सारळ यांनी पटकविला. सदर स्पर्धे करिता परिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरील भजन सम्राट महादेव बुवा शाहाबाजकर, संगीतरत्न निवृत्ती बुवा चौधरी, सुनील पाटील, श्रीधर पाटील यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेत उत्तेजनार्धन बाप्पादेव भजन मंडळ पेझारी व श्रीकृष्ण भजन मंडळ कोंझर कुर्डुस यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. अलिबाग तालुक्यातील 11 भजन मंडळांनी उत्तम प्रकारे सादरीकरण केले.