ओम पावशेची कुमार गटात निवड

| खांब | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा कुमार गट निवड व अजिंक्यपद चाचणी कबड्डी स्पर्धेत रोहा येथील जय बजरंग क्रीडा मंडळाच्या कुमार गट संघाने उत्कृष्ट कामगिरी करत पहिल्या 8 संघांमध्ये स्थान मिळवले. या स्पर्धेत जय बजरंग रोहा संघाचा अष्टपैलू खेळाडू ओम पावशे याने आक्रमण आणि बचाव या दोन्ही विभागांत प्रभावी खेळ करत संघाच्या कामगिरीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. ओमच्या या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीची दखल घेत त्याची रायगड जिल्हा कुमार गट कबड्डी संघात निवड करण्यात आली आहे. आता तो पालघर येथे होणाऱ्या 53 व्या महाराष्ट्र राज्य निवड व अजिंक्यपद कुमार गट कबड्डी स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. ओमच्या या निवडीबद्दल जय बजरंग क्रीडा मंडळ रोहाचे अध्यक्ष अमर सलागरे यांनी त्याचे अभिनंदन करून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, ओमने यापुढेही सातत्यपूर्ण मेहनत आणि उत्कृष्ट कामगिरी करत रायगड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Exit mobile version