। पनवेल । वार्ताहर ।
ट्रकच्या धडकेने पादचारी दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जण जखमी झाले असून त्याला नजिकच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. पनवेलजवळील आसुडगावकडून कळंबोली सर्कल येथे जाणार्या पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेच्या एक्झिट बायपास रोडवर किशन शेट्टी (24) व त्याचा मित्र राजेंद्रकुमार वर्मा (28) व सोनकुमार मोदी (25) हे तिघे पायी जात असताना त्यांना एक ट्रकची धडक बसल्याने झालेल्या अपघातात राजेंद्रकुमार वर्मा हा गंभीररित्या जखमी होवून मयत पावला आहे. तर सोनकुमार मोदी व किशन शेट्टी हे जखमी झाले आहेत. याबाबतची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.