मोफत चष्मेवाटप कार्यक्रम
| चणेरा | वार्ताहर |
शेतकरी कामगार पक्षातर्फे रोहा तालुक्यातील महादेवखार (महाळुंगे) येथे रेश्मा रघुनाथ कांबळे हिच्या विवाहाचे औचित्य साधून मोफत चष्मेवाटप व नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले.
यावेळी महादेवखार सरपंच नारायण गायकर, उपसरपंच संकेत जोशी, मजदूर फाऊंडेशन अध्यक्ष हेमंत ठाकूर, तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विनायक धामणे, विठ्ठल मोरे, न्हावे सरपंच राजेश्री शाबासकर, हिराजी काणेकर, शंकर दिवकर, राज जोशी, अशोक शिंगरे, नेत्रतज्ञ डॉ. म्हात्रे, डॉ. सोनावणे, अमित देशपांडे, मनोहर वारंगे, चंद्रकांत कांबळे, यशवंत शिंदे, सुचिता शिंदे, दर्शना मोरे, निलम वारगे, मच्छिंद्र पवार, मिलिंद गायकर, विजय काडणेकर ग्रामसेविका नागोठणेकर, ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी नेत्रतज्ञ डॉ. म्हात्रे, डॉ. सोनावणे, अमित देशपांडे यांच्या टिमने महादेवखार (महाळुंगे) गावातील लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले. स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.