अॅमेझॉन, फ्लिपकार्टसह अनेक कंपन्यांना नोटीस
मुंबई | प्रतिनिधी |
स्वयंपाकघरात सोयीचं म्हणून हमखास वापरलं जाणारं भांडं म्हणजे प्रेशर कुकर. पण हा कुकर जितका सोयीचा असतो तितकाच धोकादायकही असतो. याच धोक्यामुळे त्याला देशातील ग्राहक हक्क संरक्षण प्राधिकरणाने मोठ्या मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांना नोटीस धाडली आहे.
केंद्रीय ग्राहक हक्क संरक्षण प्राधिकरण अर्थात सीसीपीएने अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, शॉपक्ल्यूज, पेटीएम मॉल अशा विविध ई-कॉमर्स कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. सदर कंपन्यांनी सीसीपीएने 21 जानेवारी 2020 रोजी घरगुती वापराच्या प्रेशर कुकर संबंधित जारी केलेल्या आदेशांचं उल्लंघन केल्याचं या नोटीसीत म्हटलं आहे.
घरगुती कुकरचं मानक खड 2347:2017 असं असून त्यानुसारच त्याची रचना असणं अनिवार्य आहे. तसंच ऑगस्ट 2020पासून लागू झालेल्या बीआयएसअन्वये त्याचं चिन्हंही कुकरवर असणं गरजेचं आहे. मात्र, सध्या या कंपन्यांच्या वेबसाईटवर जे कुकर मिळत आहेत, त्यातील बहुतांश नकली किंवा हे मानक नसलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या विक्रीवर बंदी आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे.
सीसीपीएने देशभरातील नकली मालाच्या विक्रीवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार वेगवेगळ्या पातळ्यांवर काम सुरू आहे. प्रेशर कुकरखेरीज हेल्मेट, कुकिंग गॅस सिलिंडर अशा विविध उत्पादनांच्या मानकांनाही काटेकोरपणे पाळण्याचे आदेश प्राधिकरणाने जारी केले आहेत.