चाहत्यांचे देव पाण्यात

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

यंदाच्या टी-20 विश्वचषकातील भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्या आधी भारताने विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय संघाचे चाहते पुजा हवन करत आहेत.

उपांत्य फेरीत भारतीय संघाने इंग्लंड संघाला धूळ चारत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. तर, दुसरीकडे दक्षिण आफ्रिकाने अफगाणिस्तानला मात देऊन अंतिम सामन्याचे तिकिट पक्के केल होते. भारताने अंतिम सामना जिंकावा यासाठी भारतीय चाहते प्रार्थना करत होते. तसेच, विविध शहरांमध्ये पूजा आणि होम हवन करत होते. उत्तर प्रदेशातील कानपूरमधून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेटपटूंच्या फोटोसह चाहते मंदिरात पूजा करत असल्याचे दिसून आले.

याशिवाय, वाराणसीतून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये चाहते भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना करताना दिसत होते. भारताच्या विजयासाठी चाहत्यांनी वाराणसीमध्ये हवन केले. यावेळी मंदिरात क्रिकेटच्या बॅट, भारतीय खेळाडूंचे फोटो आणि तिरंगा घेऊन चाहते उपस्थित होते.

Exit mobile version