| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
काँग्रेस नेेते राहुल गांधी यांनी नवीन पासपोर्ट मिळवण्यासाठी दिल्ली न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेला न्यायालयाने परवानगी दिली आहे. ना हरकत प्रमाणपत्र तीन वर्षांसाठी वैध असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी वैभव मेहता यांनी गांधींच्या याचिकेला अंशतः परवानगी दिली.
राहुल गांधी यांना नवीन पासपोर्टसाठी एनओसीची गरज होती. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होची. यावर शुक्रवारी सुनावणी झाली. गांधी यांनी दहा वर्षासाठी एनओसीचा कालावधी वाढवून मागितला होता. मात्र न्यायालयाने राहुल गांधी यांना 3 वर्षासाठी एनओसी वैध असल्याचे म्हटले आहे. वकिलांच्या मते, न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ असा आहे की, जर त्याला एनओसीची मुदत वाढवायची असेल, तर त्याला तीन वर्षांनी पुन्हा न्यायालयात यावे लागेल.