दोन सुवर्ण, दोन रौप्य, एका कांस्य पदकाची कमाई
| रसायनी | वार्ताहर |
नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुलात दि. 18 ते 20 मेदरम्यान पार पडलेल्या इंडिया तायक्वांदो चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन सीरिज कुरयोगी, सबज्युनियर, कॅडेट, ज्युनिअर स्टॉप 4 महाराष्ट्र या इंडिया तायक्वांदो स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील कराटेपटूंनी दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाची कमाई करीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे जिल्हाभरातून कौतुक करण्यात येत आहे.
रसायनीतील साईंराज जयवंत पाटील आणि श्लोक सचिन माळी यांनी अंतिम सामन्यात सुवर्णपदकाची कमाई केली. तसेच पनवेल येथील वीर तायक्वांदोचे स्वयंम नाईक, खंतेश वासकर यांनीही अंतिम फेरीत आपलं कौशल्य दाखवून सुवर्णपदकांची कमाई केली. तर गुरुकुल तायक्वांदो अकादमीच्या श्रवण भोसले, ओमकार भोसले, राम जाधव, साई जाधव, प्रिती पाटणे यांनी सुवर्णपदक पटकावले. निहाल भोईर- रौप्य पदक, मुस्तफा शेख – रौप्य पदक, श्रीजय भगत- कांस्यपदक पटकाविले. गुरुकुल तायक्वांदोचे प्रशिक्षक तुषार सिनलकर आणि रोहित सिलनकर यांचबरोबर एटीएआरचे सचिव सचिन माळी यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. खेळाडूंच्या या कामगिरीबद्दल ॲड. प्रज्ञा भगत, सेक्रेटरी संजय भोईर, अध्यक्ष हरेश्वर भगत, उपाध्यक्ष हेमंत कोळी, खजिनदार संदीप भगत, सदस्य निखिल भोईर व गणेश शिंदे यांनी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यातील सुवर्णपदक मानकरी खेळाडूंची चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.