मुंबई विभागात सर्वोत्तम; पुन्हा मुलींचीच बाजी
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
बारावी परिक्षेचा निकाल गुरुवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. त्यात रायगड जिल्ह्यातील 91.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन टक्क्यांनी निकाल घसरला आहे. गेल्यावर्षी 93.11 टक्के निकाल लागला होता. तथापि मुंबई विभागात मात्र रायगड जिल्ह्याने यावर्षी देखील बाजी मारली आहे. मुंबई विभागात 88.13 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालात मुलांच्या तुलनेत मुलीच सरस ठरल्या आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 94.48 टक्के तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 89.57 टक्के इतके आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे 2023 मध्ये इयत्ता बारावीची परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल मंडळाच्या संकेतस्थळांवर दुपारी 2 वाजता जाहीर करण्यात आला. बारावीच्या परिक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून 30 हजार 725 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 30 हजार 583 विद्यार्थी परिक्षेला सामोरे गेले. यामधील 28 हजार 121 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, 2 हजार 462 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 91.94 टक्के इतके आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त निकाल 97.30 टक्के तळा तालुक्याचा लागला असून, सर्वात कमी 81.28 टक्के निकाल मुरुड तालुक्याचा लागला आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत 1.17 टक्क्यांनी बारावी परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील 93.11 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तर चालू वर्षात 91.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाखानिहाय निकालानुसार विज्ञान शाखेत 95.56 असा सर्वाधिक तर त्याखालोखाल वाणिज्य शाखेचा 93.50 टक्के, किमान कौशल्य शाखेचा 92.78 टक्के एवढा आणि कला शाखेचा 82.95 सर्वात कमी निकाल लागला आहे.
तालुकावार निकालाची टक्केवारी
पनवेल – 96.53, उरण – 93.24, कर्जत – 86.38, खालापूर – 82.42, सुधागड – 82.42, पेण – 89.67, अलिबाग – 91.41, मुरुड – 81.28, रोहा – 92.65, माणगाव – 94.62, तळा – 97.30, श्रीवर्धन – 94.53, म्हसळा – 94.75, महाड – 87.51, पोलादपूर – 88.21.
43.41 टक्के पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण
रायगड जिल्ह्यातील 923 पुर्नपरीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. यामधील 919 विद्यार्थी परीक्षेला सामेरे गेले. त्यापैकी 399 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, 520 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. पुर्नपरिक्षार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 43.41 टक्के इतके आहे.\
रायगड जिल्ह्याची बाजी
बारावी परीक्षेत मुंबई विभागाचा निकाल 88.13 टक्के लागला असून, मुंबई विभागात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रायगड जिल्ह्याने बाजी मारली आहे. जिल्ह्यातील 91.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ठाणे 88.90, पालघर 90.76, मुंबई (जनरल) 84.21, मुंबई (सब.1) 86.80, मुंबई (सब.2) 86.32 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
म. ल. दांडेकर महाविद्यालयात मुलीचा डंका
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड जंजिरा विद्या मंडळ संचलित सर एस ए हायस्कूल व स्व. म. ल. दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयात 12 वीच्या निकालात तिन्ही शाखेत मुलीचा डंका दिसुन आला. कला शाखेत 46.07 टक्के निकाल लागला असुन कोमल पाटील 69.50 टक्के, संस्कार पाटील 73.50 टक्के, रोहन हातचांगे 60.33 टक्के मिळाले आहेत. वाणिज्य शाखेचा 91.80 निकाल लागला असुन सेजल खोत 89.50 टक्के, विश्वम पोतदार 87.00 टक्के, प्रणव पाटील84.83 टक्के मिळालेत. बँकिंग शाखेत 100 टक्के लागला असुन हर्षाली पाटील 68.67 टक्के, एजाझ उलटे 64.00टक्के, सुरज आग्रावकर 61.83टक्के मिळाले असुन या सर्वांचा अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक यांनी केले.
श्रीमती सविता नीलकंठ सावंत जुनिअर कॉलेजचा 100 टक्के निकाल
| माणगाव | वार्ताहार |
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवार दि. 25 मे रोजी ऑनलाईन जाहीर झाला. या बारावी परीक्षेत माणगाव येथील जे.बी. सावंत एजुकेशन सोसायटी संचालित श्रीमती सविता नीलकंठ सावंत जुनिअर कॉलेजने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवीत या कॉलेजचा वाणिज्य शाखेचा बारावी परीक्षेचा निकाल 100 टक्के इतका लागला असून सुप्रिया सकपाळ या विद्यार्थिनीने 74.83 टक्के इतके गुण संपादन करून महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान पटकाविला.
या कॉलेजमधून सलोनी पोळेकर 66.17 टक्के गुण द्वितीय तर उज्वला पवार 63 टक्के गुण तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. या महाविद्यालयातून यंदा बारावी परीक्षेसाठी एकूण 24 विद्यार्थी बसले होते. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे नानासाहेब सावंत, अण्णासाहेब सावंत, भाऊसाहेब सावंत, रामदास पुराणिक, हर्षल जोशी, प्राध्यापक माळी, प्राध्यापक मोरे, दिलीप ढेपे, संजय गायकवाड,सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले आहे.
र.ना.राऊत महाविद्यालयाचे यश
| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुका शिक्षण प्रसारक व सहाय्यक मंडळाच्या श्रीवर्धन येथील कनिष्ठ महाविद्यालयाचा फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या 12 वी च्या परीक्षेचा निकाल 91.91 टक्के लागला असून त्यापैकी कला शाखेचा निकाल 94.28 टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल 91.41 टक्के लागला आहे. या उज्वल निकालाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे संस्थेचे अध्यक्ष अनिल भुसाणे, उपाध्यक्ष पोलेकर, कार्यवाह योगेश गंद्रे, शाळा समितीचे सभापती जितेंद्र सातनाक आदिंनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
एस.एस.निकम कॉलेजच्या उज्वल यशाची परंपरा कायम
| माणगाव | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवार दि.25 मे 2023 रोजी ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेत माणगाव येथील माणगाव एजुकेशन ट्रस्ट माणगाव संचालित एस.एस.निकम ज्युनिअर सायन्स कॉलेज माणगावने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या ज्युनिअर सायन्स कॉलेजचा बारावी परीक्षेचा एकूण निकाल 100 टक्के लागला असून स्मित मेथा या विद्यार्थ्याने 73.17 टक्के इतके गुण संपादन करून कॉलेजमध्ये सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे.
फर्जिन गाळसुळकर या विद्यार्थिनीने 72.50 टक्के, अल्फीया सनगे 72.17 टक्के, रूहान हाजीते 71.33 टक्के, समृद्धी जाधव 69.67 टक्के इतके गुण संपादन केले. या कॉलेजमधून यावर्षी बारावी परीक्षेसाठी यावर्षी एकूण 20 विद्यार्थी बसले होते. हे सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी 18 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 2 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. मदन निकम, संस्थेचे सर्व पदाधिकारी सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी विशेष अभिनंदन केले.
क्रिश जैन मुरुडमध्ये प्रथम
| आगरदांडा | प्रतिनिधी |
क्रिश जैन हा अंजुमन इस्लाम जंजिरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी होता. त्याने विज्ञान शाखेत 78.33 टक्के गुण मिळवून मुरुड तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. अंजुमन इस्लाममधील विज्ञान शाखेतील चापेकर अमरीन अमानुल्लाह हिला 74.17 टक्के गुण प्राप्त होऊन द्वितीय क्रमांक मिळवला आहे. टाके मुइझ मुशाररिफ याला 72.33 टक्के गुण मिळाले आहेत. अंजुमन इस्लाम जंजिरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील 100 विद्यार्थ्यांपैकी 97 विद्यार्थी पास झाले आहेत.कला शाखेत 66 विद्यार्थ्यांपैकी 51 पास झाले आहेत. या विद्यालतील टाके सानिया अझीम हिला कला शाखेत 69.83 टक्के मिळाले आहेत. सना खातून रफिक 67.83 टक्के मार्क मिळाले आहेत. तर घलटे नूरीन नौशाद हिला 63.33 टक्के गुण मिळाले आहेत.
उर्दू हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजने राखली निकालाची परंपरा
| नागोठणे | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील उर्दू माध्यमाचे एकमेव ज्युनिअर कॉलेज म्हणून एन.ई.एस.उर्दू हायस्कूल-ज्युनिअर कॉलेज नागोठणेची ओळख आहे.कला शाखेचा निकाल 94.11 टक्के लागला. कला शाखे मध्ये या वर्षी एकूण 17 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यातून 16 उत्तीर्ण झाले आहेत. यात रसलकर रहमत 58.40 टक्के मनियार जवेरिया 55.83 टक्क्े, मुजावर अमिना 54.83 टक्क्े गुण मिळाले. वाणिज्य शाखतू एकूण 31 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते, त्यात 28 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आयेशा पिथू 87.33 टक्के, सफा खान 73.67 टक्के, अमान मुल्ला 71.83 टक्के गुण मिळविले. कॉलेजच्या यशाबद्दल चेअरमन आब्दूस्समद अधिकारी, लियाकत शैखली कडवेकर, सगिर अधिकारी, शब्बीर पानसरे, डॉ.सादिया दफेदार, शाळेचे प्राचार्य व सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे कौतूक करण्यात आले.