| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड शहरात रास्त धान्य दुकाने चार असून याठिकाणी शिधापत्रिकाधारकांना गहु व तांदूळाचे वितरण केले जाते. परंतु महिना संपत आला तरी गहु मिळत नसल्याने शिधापत्रिकाधारकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तांदुळ मिळाले गहु कुठे अटकला असा प्रश्न रास्त भाव दुकानदारांना विचारला जात आहे.
गरजुंवर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये यासाठी केंद्र सरकारानी प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य दिले जाते. या योजनेत गरिबांना कोणतेही पैसे द्यावे लागत नाही. हे धान्य दर महिना शिधापत्रिकावरील एका व्यक्तीस तीन कीलो तांदूळ व दोन किलो गव्हाचे वितरण इ-पॉस मशिनद्वारे दिले जाते. परंतु महिना संपत आला तरी मुरुड पुरवठा विभागाकडुन गव्हाचे वितरण न झाल्याने शिधापत्रिकाधारकांना गव्हापासुन वंचित राहावे लागत आहे.
मुरुड पुरवठा विभागाने तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु महिना संपत आला तरी पुरवठा विभाग याकडे लक्ष देताना दिसत नाही. आता शिधापत्रिकधारकांनी करायचं काय हा मोठा प्रश्न सर्वच शिधापत्रिकधारकांना पडला आहे.
रेशनचे दुकान शहराच्या टोकावर आहे. मी सतत तीन दिवस रेशन घेण्यासाठी जात आहे. परंतु रेशन दुकानात गहु नसल्याने परत जात आहे. शेवटी नाइलाजाने तांदूळ घेतले. परत गव्हासाठी पुन्हा फेरी मारायला लागणार आहे. कोण चालत येतात तर कोणी रिक्षा घेऊन येत आहे. त्यामुळे प्रत्येकाची फेरी फुकट जात असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
फुलमाळी ग्राहक