| उरण । वार्ताहर ।
तालुक्यातील सिडकोच्या हद्दीतील सिडकोने सीसीटीव्ही कॅमेर्याची दुरुस्तीची कामे हाती घेतली असल्याने नागरिक सुरक्षित होणार असून गुन्हे शोध साठी पोलिसांना ही त्याची मदत होणार आहे. तालुका मोठ्या प्रमाणावर औद्योगिक दृष्ट्या प्रगत होत आहे. उरण तालुक्यातील सिडकोच्या माध्यमातून ही विकास होत आहे. ह्या विकासामुळे वाहनांची वर्दळ वाढू लागली आहे. सिडकोच्या द्रोणागिरी नोड च्या माध्यमातून ही नागरिकरण ही झपाट्याने वाढू लागले आहे. त्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सिडकोच्या माध्यमातून सिडको हद्दीमध्ये ठिकठिकाणी 26 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.
सिडकोच्या माध्यमातून सिडकोच्या कार्यालय बस थांबा नवघर सर्कल, नवघर गाव, भेंडखल गाव, सीडब्ल्यू सी नाका, द्रोणागिरी टी सर्कल, आयओटीएल, शेवा गाव सर्कल, उरण चार फाटा, जीडीएल, पागोटे कुंडेगाव रोड, बोकडविरा अशा विविध भागात सिडकोच्या माध्यमातून 26 सीसीटीव्ही काही महिन्यांपूर्वी लावण्यात आले होते.
त्या भागातले 14 सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. जे कॅमेरे बंद अवस्थेत होते आणि त्यांची दुरुस्ती आणि इतर कमेर्यांची मेंटनेसचे काम सिडकोच्या मार्फत करण्यात आले आहे. त्यामुळे आत्ता एखादा अपघात किंवा गुन्ह्याची उकल होण्यासाठी पोलीसांना सीसीटीव्ही कॅमेरांची मदत होणार आहे.