साळाव-तळेखार रस्ता नादुरूस्त

| रेवदंडा | वार्ताहर |

साळाव ते तळेखार रस्त्याची पुरती दुरावस्था झाली असून अनेकदा लहान मोठी अपघात घडून आली आहेत.मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याचे या रस्ताकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे मुरूड उपतालुका युवा अधिकारी विकी वेगस् यांनी याबाबत मुरूड सार्वजनिक बांधकाम खाते यांच्याकडे रस्त्याच्या दुरवस्थेबाबत निवेदन अर्ज दिले आहे. या निवेदन अर्जासह त्यांनी साळाव ते तळेखार दरम्यान पडलेल्या असंख्य खड्डयाचे छायाचित्र सुध्दा जोडले आहेत. या रस्त्याने साळाव जेएसडब्लू कंपनीची कंपनीतील मालवाहतुक ट्रक नित्याने जा-ये करत असल्याने रस्त्याची दुरावस्था झाली असल्याचा आरोप स्थानिक प्रवासीवर्ग करत आहेत.

Exit mobile version