सरचिटणीस जयंत पाटील यांची उपस्थिती
। रायगड जिल्हा प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन पेझारी येथील खारेपाट विभागीय कार्यालया येथे साजरा करण्यात आला. शेकाप नेते रामदास जराते यांच्या हस्ते लाल बावट्याचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पेझारीत लाल बावट्याला सलाम करत हा सोहळा उत्साहात साजरा केला. यावेळी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील,
कार्यालयीन चिटणीस राजेंद्र कोरडे, सुप्रिया पाटील, प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, विलास म्हात्रे, शरद वरसोलकर, तालुका चिटणीस सुरेश घरत, तालूका सहचिटणीस नरेश म्हात्रे, शेतकरी संघटना तालूका प्रमुख अनिल गोमा पाटील, बाळाराम दांडेकर, कमळाकर म्हात्रे, राजन म्हात्रे, नरेश म्हात्रे, अजित भगत, प्रमोद राऊत, मोहन म्हात्रे, पुजा, भगत आदी शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो, लाल बावटे की जय असा जयघोष करी कार्यकर्त्यांनी पेझारीमध्ये जल्लोषात वर्धापन दिन साजरा केला.
