उपसभापतीपदी जयवंत पाटील
| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी शेकापचे संतोष जंगम तर उपसभापतीपदी जयवंत पाटील बिनरोध निवड करणयात आली. गुरूवारी ही निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीनंतर शेकाप कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी करून जंगम यांचे अभिनंदन केले आहे.
सभापतीपदासाठी संतोष जंगम तर उपसभापती पदासाठी जयवंत पाटील यांचा या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले होते. विरोधी अर्ज न आल्याने निवडणूक अधिकारी सुनील कुलकर्णी यांनी जंगम यांची सभापती तर पाटील यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत जंगम व पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहे.
या निवड प्रक्रिये दरम्यान नवनिर्वाचित सदस्य रामभाई देशमुख, निकेशभाई देशमुख, निलेश घोसाळकर, नारायण पाटील, भूषण कडव, शांताराम पाटील, हनीफ दुदुके, धनंजय देशमुख, शिवानी जंगम राष्ट्रवादीचे संचालक अजित देशमुख सभागृहात उपस्थित होते. यावेळी शेकाप तालुका चिटणीस संदीप पाटील संचालक जिल्हा बँकचे प्रवीण लाले, अजय भारती, चंद्रकांत पाटील, दिलीप पोरवल, राजू अभाणी, नरेंद्र शहा, नथुराम कांगे, चंद्रकांत घोसाळकर, दिलीप कांबळे, नरेश नामदेव पाटील, अभिजित ठाकूर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शेतकरी व व्यापारी यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जे सहकार्य करता येईल ते करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलले जातील, अशी प्रतिक्रिया सभापती संतोष जंगम यांनी दिली.