आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अलिबागेत पदाधिकाऱ्यांची बैठक; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने स्मार्ट मीटरविरोधात होणाऱ्या आंदोलनाची जोरदार तयारी सुरू झाली असून, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.7) अलिबाग येथील शेकाप भवनमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शेकापच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट करत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, कामगार आघाडी प्रमुख प्रदिप नाईक, अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षय नाईक, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, तालूका चिटणीस सुरेश घरत, माजी तालूका चिटणीस अनिल शांताराम पाटील, अलिबाग पंचायत समितीचे सदस्य अंजली ठाकूर, नगर परिषद पाणी सभापती अनिल चोपडा, जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, ॲड.नीलम हजारे, ॲड. परेश देशमुख, सुरेश खोत, निलेश खोत, संदीप गायकवाड, विक्रांत वार्डे, तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे, ॲड. के.डी पाटील, दत्ता ढवळे, प्रमोद घासे, दिपक पाटील, आप्पा पिंगळे तसेच वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
