। अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
चौक पोलीस स्टेशन हद्दीत मोरबे धरणाच्या पात्रात एका जोडप्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
पोलीस यंत्रणा या ठिकाणी पोचली असून स्वतः पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दोन्ही मृतदेह अपघातग्रस्त मदत टीमने पात्रातून बाहेर काढले आहेत. या आत्महत्येचे नेमके कारण समजले नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत.